दीपस्तंभ:- डॉ.पंजाबराव देशमुख

December 26, 2006 at 5:42 am | Posted in Din Vishesh | 1 Comment

bhau.jpgदि.२७ डिसेंबर ! डॉ.भाऊसाहेब देशमुख यांची जयंती!

शेतकऱ्यांचे हक्कांसाठी लढणारे महान नेतृत्व! भारताचे माजी कृषिमंत्री! बहुजनांच्या स्वाभिमानासाठी लढणारे स्वाभिमानी काळीज! शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे महान शिक्षणतज्ञ!

भाऊसाहेबांसारख्या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन!

http://en.wikipedia.org/wiki/Dr.Panjabrao_Deshmukh

Advertisements

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

November 28, 2006 at 12:00 am | Posted in Din Vishesh | Leave a comment

२८ नोव्हेंबर !  भारतीय शैक्षणिक व सामाजिक क्रांतिचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतीदिन! बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या या महात्म्याला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनःपुर्वक आदरांजली!

चला,बहुजनांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या या महात्म्याच्या कार्याला वंदन करून २८ नोव्हे. हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळुया!

भारतीय संविधान वर्धापनदिन!

November 26, 2006 at 7:05 am | Posted in Din Vishesh | Leave a comment

जवळपास तीन वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यासानंतर आणि परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संधान अस्तित्वात आले. या युगप्रवर्तक घटनेला आज ५७ वर्ष पुर्ण होत आहेत.

मनुस्मृतीला नाकारून सर्व भारतियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या त्या थोर महात्म्याला आजच्या दिवशी मनःपुर्वक आदरांजली!

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना,
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!

PREAMBLE-THE CONSTITUTION OF INDIA

November 26, 2006 at 6:53 am | Posted in Din Vishesh, Great Writings | Leave a comment

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:

JUSTICE, social, economic and political;

LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;

EQUALITY of status and of opportunity;

and to promote among them all

FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;

IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

साहित्यसम्राट अण्णभाऊ साठे जयंती

August 1, 2006 at 4:07 am | Posted in Din Vishesh | Leave a comment

आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती! शतशः अभिवादन!

अण्णाभाऊ साठे यांच्या एकुण १४ कादंबऱ्या , अनेक कथासंग्रह तसेच अनेक स्फूट लिखाण प्रसिद्ध झाले आहे. अनेक कादंबऱ्यांवर चित्रपटसुद्धा निघाले आहेत. ‘फकिरा’ या अतिशय गाजलेल्या कादंबरीच्या तर आतापर्यंत १९ आवृत्त्या निघाल्या आहेत.

अण्ण्भाऊ फक्त काळ्यावर पांढरं करणारे पांढरपेशे लेखकु नव्हते तर लोकनाट्याच्या माध्यमातून साम्यवादाचा विचार समाजात पोहचवणारे खंदे शाहिर होते.

“जग बदल घालुनी घाव,सांगुनी गेले मज भिमराव” या त्यांच्या ओळींना समोर ठेवून डॉ. एकनाथ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा अखिल मातंग समाज बौद्ध धर्माच्या छत्राखाली एक होत आहे.

हिंदू धर्मातील एक आणखी उपेक्षीत घटक उज्ज्वल भवितव्याच्या मार्गावर निघाला आहे. आजच्या या जयंतीदिनी त्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

Create a free website or blog at WordPress.com.
Entries and comments feeds.