शिवधर्म प्रतिज्ञा

October 1, 2006 at 12:47 pm | Posted in जय जिजाऊ ! | 4 Comments

१२ जानेवारी २००५ रोजी शिवधर्म प्रकटन उत्सवात तीन लाख बहुजनांनी शिवधर्मात प्रवेश करतांना घेतलेली प्रतिज्ञा!

मी (स्वतःचे नाव)(आईचे नाव)(वडिलांचे नाव)(आडनाव)
आज जिजाऊंच्या प्रेरणेने शिवधर्माच्या दिशेने वाटचाल करण्याची शपथ घेत आहे.येत्या तीन वर्षाट परिपुर्ण शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक असलेली कठोर साधना करण्यासाठी मी आज कटिबद्ध होत आहे.
मी शिवधर्माच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीन. शिवधर्माची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी अयुष्यभर कार्यरत राहीन,अशी मी प्रतिज्ञा करतो/करते.

जय जिजाऊ!

आगामी शिवधर्म दीक्षाविधी सोहळा जिजाऊ सृष्टी,सिंदखेड राजा जि.बुलडाणा येथे १२ जानेवारी २००८, माँ जिजाऊंच्या जन्मदिनी होणार आहे.

जिजाऊ वंदना

October 1, 2006 at 12:32 pm | Posted in जय जिजाऊ !, Great Writings | Leave a comment

जिजाऊ वंदना ही शिवधर्माची अधिकृत प्रार्थना आहे. सर्व जिज्ञासू आणि शिवधर्मियांसाठी ही जिजाऊ वंदना येथे उपलब्ध करून देत आहे.

जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥

तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥

तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥

जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ !

टीप- जिजाऊवंदना एकट्याने अथवा सामुहिक म्हणता येऊ शकते. मनातल्या मनात डोळे मिटून प्रर्थनेसारखे वंदन करता येते. सामुहिक ठिकाणी हात जोडून वंदना म्हणावी.

पंखांना आकाश दिसावे..

September 16, 2006 at 4:34 am | Posted in जय जिजाऊ ! | 1 Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक विधान अतिशय प्रसिद्ध आहे. “गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणिव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील” आपण सर्वांनी हे विधान बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आणि वाचलेलं आहे.पण या विधनातील मर्म मात्र अजून बऱ्याच लोकांना कळलेलं दिसत नाही. कदाचित ‘अतिपरिचयद् अवज्ञा’ अशी या विधानाची गती झाली असावी.

हिंदू धर्मातील महार या जातीने बाबासाहेबांच्या या विधानाची किंमत जाणली अन् आज तो समाज सर्व अंगांनी फुलत फळत आहे. इतरांनी मात्र या विधानाकडे हवे तितके लक्षच दिले नाही. अजुनही हिंदु धर्मात शुद्राच्या पायरीवर उभा असलेला मराठा, कुणबी, तेली, माळी, कुंभार, सुतार, लोहार ई.ई. समाज त्या पायरीवर उभा राहण्यातच धन्यता मानत आहे.किंबहुना आपण या पायरीवर उभे आहोत हेच त्यांना माहित नाही. हिंदू म्हणवण्यातच ते स्वतःची धन्यता मानतात.

यापार्श्वभूमीवर शिवधर्माच्या उदयाने समाजात बरेच परिवर्तन घडून येत आहे. लोकांना हिंदू वैदिक धर्मात त्यांचे नेमके स्थान काय आहे ते कळायला लागले आहे. लोक हळूहळू जागे होत आहेत, पण समाजप्रबोधनाची ही गती पुरेशी मात्र नाही. प्रसारमाध्यमे अजुनही जागी झालेली नाहीत आणि ती जोपर्यंत त्यांच्या ताब्यात आहेत तोपर्यंत ती जागी होणारही नाहीत. मराठामार्ग, जिजाऊ संदेश, बळीराज धोटे यांचे भुमीपुत्राची हाक ही काही नियतकालिके आहेत पण त्यांचा वाचकवर्ग ठाराविक आहे हेसुद्धा नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मा.प्रकाश पोहरे यांचे दै.देशोन्नती महत्त्वाची भुमीका पार पाडत आहे.

शेवटी महत्वाचा मुद्दा हा आहे की लोकांनी त्यांच्या डोक्यांनी विचार करावा अन् त्यांना तो विचार करायला कुणीतरी उद्युक्त करावं. मराठा सेवा संघ, भारतीय सत्यशोधक समाज हे काम अतिशय समर्पित भावनेनं, पोटतिडकीनं करत आहेत. पण तेवढ्यानं आत भागणार नाही. स्वतःच्या स्वाभिमानाचा हा विचार प्रत्येकाच्या मनात पेटायला हवा. पिंजऱ्याला चिकटलेल्या पाखरांना आपल्या पंखांची जाणिव व्हावी, पिंजऱ्याबाहेर अनंत आकाश आपली वाट पाहत आहे.

Check it out !

July 24, 2006 at 4:21 am | Posted in जय जिजाऊ ! | Leave a comment

Link to Shivadharma’s official Website-

      www.shivdharma.com

सूरत बदलनी चाहिये ….

July 2, 2006 at 8:21 am | Posted in जय जिजाऊ ! | 7 Comments

 शिवधर्म काय आहे याची ऐकीव माहिती असलेल्या बऱ्याच लोकांना शिवधर्मला फक्त हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्या लोकांचा एक समुह एवढंच समजतात . यात त्यांची काही चूक आहे असंही नाही. कारण प्रसारमाध्यमांमधून त्यांना जेवढं ऐका-वाचायला मिळतं  त्यातून शिवधर्माची अशी प्रतिमा निर्माण होणं काही आश्चर्याची गोष्ट नाही. आणि प्रसारमाध्यमे कुणाच्या ताब्यात आहेत ही काही पुन्हा सांगण्याची गोष्ट नाही.           आज पहिल्यांदा या मुक्त मंचावरून शिवधर्माचा आवाज लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही शिव हे नाव घेऊन जगासमोर येत आहोत. शिव म्हणजे सत्य, सुंदर ! आता सत्य सांगणे याला कुणी शिव्या देणे असं म्हणत असतील तर तो त्यांच्या पुर्वाग्रहाचा प्रश्न आहे.

हिंदू धर्मात समानता नाही असं म्हणणे म्हणजे शिव्या देणे असं जे समजत असतील ते वस्तुस्थितीकडे पाठ फिरवत आहेत असेच म्हणावे लागेल. आणि शिव्या देऊन परिवर्तन होत नसते याची जाणिव आम्हाला नसेल असाही गैरसमज कुणी करून घेत असेल तर मग प्रश्नच नाही.

दुष्यंतकुमार यांचा एक शेर मला आठवत आहे –

सिर्फ़ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं

मेरी कोशीश हैं की ये सूरत बदलनी चाहिये

आणखी काय सांगू?

जय जिजाऊ !

June 20, 2006 at 1:28 pm | Posted in जय जिजाऊ ! | 1 Comment

परिवर्तनाच्या चळवळीत महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या या भूमीने एकापाठोपाठ अशा अशा नव्या विचारांना सतत जन्म दिला आहे जे आपपल्या काळात जगासाठी पथप्रदर्शक ठरले होते आणि ठरत आहेत.

या महाराष्ट्राच्या भूमीत पुन्हा एकदा नवीन विचारांच्या उदयाने शिवधर्माचे प्रकटन आहे. शिवधर्म हा आजच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे. शिवधर्म एक शिकवण आहे- स्वाभिमान हरविलेल्या बहुजनांना मोकळा श्वास घेण्याची ! शिवधर्म एक जीवनपद्धती आहे ताठ मानेने जगण्याची ! शिवधर्म एक मार्ग आहे समतेच्या जगात जाण्याचा!

शिवधर्माच्या या विचारपिठावर होऊ दे एक वैचारीक मंथन, जे घेऊन जाईल तुम्हाला आणि मला एका नवीन जगात जेथे आपले पाय शेंदरी दगडांना ठेचाळणार नाहीत, आपल्या तथाकथित हिंदुत्वाचे शिलेदार जिथे तुम्हाला-मला फ़सऊ शकणार नाहीत देवाच्या, धर्माच्या, वर्णाच्या आणि हिंदुराष्ट्राच्या नावावर!

जय जिजाऊ !

Create a free website or blog at WordPress.com.
Entries and comments feeds.