शिवधर्म प्रकटन भूमिका

माझ्या भावंडांनो,
मी प्रथम आपलं स्फुर्तिस्थान असलेल्या जिजाऊंना जयंती दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. जिजाऊंना प्रेरणास्वरूप मानून धर्मचिंतनाच्या क्षेत्रात गेली काही वर्ष आपण जी वाटचाल करत आलो आहोत,ती आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे.युगायुगांची ओझी आता गळून पडत आहेत. श्वास मोकळे होऊ लागलेत. पंख बळकट होऊ लागलेत. निर्भयपणे झेपावण्यासाठी विशाल आकाश खुणाऊ लागलं आहे.मुख्य म्हणजे आपण आता स्वातंत्र्याची चव चाखली आहे.एक्दा ती चव चाखल्यावर आता पारतंत्र्याचा एक इवलासा बिंदूही सहन होणार नाही,अशी जिभेची अवस्था झाली आहे.आता आपल्याला स्वातंत्र्याची अशी भूक लागली आहे, की ती आता एक-दोन घासांनी भागणार नाही. खरं तर त्या एक दोन घासांनी ती अधिक प्रज्वलितच झाली आहे आणि ती पुर्णपणे भागून तृप्त होण्यासाठी आपण सर्व जण कमालीचे उताविळ झालो आहोत.

==आत्मभान येऊ लागलं,हे मोठं यश==
हे जे काही घडलं आहे आणि घडत आहे.ते आओअल्या सर्वांना आनंदात भिजवून टाकणारं आहे. आपल्याला आत्मभान येऊ लागलं आहे, आपल्या अस्तित्वाचा अर्थ कळू लागला आहे,हे आपल्या वाटचालीचं मोठं यश आहे.आपण यथार्थ अभिमान बाळगावा,समाधान मानावं, कृतार्थता अनुभवावी,असं बरंच काही आता घडलं आहे, यात शंका नाही.

==टीका आणि सूचना करणारांविषयी कृतज्ञ राहू या==
आपलं हे सगळं यश कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असलं तरी अल्पसंतृष्ट होऊन विश्रांती घेता येईल अशी स्थिती नाही.आपल्यापुढचं काम फार अवघड आहेऽजून खूप प्रवास बाकी आहे.आपण जे पाऊल उचललं आहे, त्याविषयी समाजातील असंख्य लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही मोजक्या व्यक्तींनी दृष्टाव्यानं अर्थहीन, निराधार आणी विध्वंसक टीका केली,हे खरं आहे. पण आपण त्यांच्यावरही रोष धरण्याऐवजी त्यांचेही आभार मानू या. त्यांच्या या टिकेमुळं आपल्याला आपलं काम अधिकाधिक निर्दोष आणि परिपुर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ज्यांनी आपल्याला अधिक डोळस होण्याचा मर्ग अशा रीतीनं दाखवला , त्यांच्याविषयी आपण कृतज्ञच असायला हवं. शिवाय,उद्याच्या काळातील आपलं शिवाचरण, हेच त्यांच्या विघातक टीकेचं प्रभावी उत्तर असेल. या मोजक्या व्यक्ती वगळता इतर असंख्य असंख्य लोकांच्या प्रतिक्रिया तर प्रामान्णिकपणाच्या आणि व्यापक समाजहिताचा सद्हेतू बाळगून दिलेल्या आहेत. त्यांच्या या प्रतिसादानं आपल्या धर्मचिंतनाची व्याप्ती, खोली आणि उंची वाढायला मदत झाली आहे. त्यांची आभार कोणत्या शब्दांत मानावेत, हे मला सनजत नाही. त्या सर्वांपर्यंत व्यक्तिगत स्वरुपात आपली कृतज्ञता पोचवणं व्यावहारिक दृष्ट्या शक्य झालं नसलं तरी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या क्षणी जाहीररित्या त्यांना सांगू इच्छितो,की ते सर्वजन आमच्या काळजाचाच एक भाग बनून गेले आहेत.
एवढ्या प्रास्ताविकानंतर मी शिवधर्माच्या स्वरुपाविषयी काही महत्त्वाच्या बाबी आपल्यापुढं ठेवू इच्छितो.

==धर्म ही अत्यंत गंभीर बाब==
धर्म ही अत्यंत, अत्यंत आणि अगदी अत्यंत गंभीर बाब आहे आणि आपण त्याच गांभिर्यानं तिच्याकदं पाहिलं पाहिजे.खरा धर्म म्हणजे एखाददुसऱ्या वेळेची भूक भागवणारं भोजन नव्हे. चार-दोन तासांचा सुखद पोरखेळ नव्हे. एखाद्या विद्वानाचं व्यासंगी पांडित्य नव्हे.एखाद्या वक्त्याचं प्रभावी वक्तृत्व नव्हे. एखाद्या साहित्यिकाचा प्रभावी ग्रंथ नव्हे. एखाद्या राजकारण्याचं तात्कालिक सत्ताकारण नव्हे. एखाद्या प्रयत्नवादी माणासाचा एखाद्या पिढीपर्यंत टिकणारा अवखळ हट्ट नव्हे. एखाद्या समर्पणशील जनसमुहाचं अधुरं स्वप्न नव्हे. खऱ्याखुऱ्या धर्मामध्ये हे सगळं आणि यासाअखं बरंच काही कमी जास्त प्रमाणात आणि पूर्ण-अपूर्ण स्वरूपात असू शकतं आणि तरी देखील खऱ्याखुऱ्या धर्माचं सुस्पष्ट दर्शन घडण्यासाठी आपल्याला अजोन खूप काही समजून घेण्याची आवशक्यता आहे. शिवधर्म ही केवळ आज इथे जमलेल्या आपल्या काअही लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी स्थलकालबद्ध वा व्यक्तिमर्यादित घटना नाही. ती आपल्या असंख्य भावी पिढ्यांना जणू काही त्यांच्या अस्तित्वाचा सांस्कृतिक गाभा आणि त्यांच्या आचार-विचारांचं नैतिक अधिष्ठान देणारी, सर्व प्रकारच्या नकारात्मक मर्यादांच्या पलिकडे जाणारी पवित्र आणि पावक अशी जीवनशैली असणार आहे.

==भूक कडाडून लागली, तरी अन्न शिजेपर्यंत कळ काढलीच पाहिजे==
धर्म ही असा दूरगामी परिणाम करणारी गोष्ट असल्यामुळं आपण तिला जास्तीत जास्त परिपुर्ण बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. लोकांनी केलेल्या सुचनांची गांभिर्यानं दखल तर घ्यायचीच, पण ज्यांच्याकदून सुचना आल्या नाहीत त्याच्याशीही संवाद निर्माण करून आप्ल्या कार्याला अधिक परिपुर्ण करायचं, हा मार्ग स्विकारणं भाग आहे. आपल्या उत्साहाच्या उर्मी दाबुनही टाकायच्या नाहीत आणि गैरवाजवी उताविळपणा करून अधांतरी लटकायचंही नाही. भूक कितीही कडाडून लागली असली तरी अन्न नीट शिजेपर्यंत कळ काढायलाच हवी. अनाठाई घाई करून अर्धंकच्च अन्न खाल्लं तर ते पोषक ठरण्या ऐवजी प्रकृती बिघडवू शकतं. अन्न घाईघाईनं शिजवण्यासाठी जास्त काळ लावला तर ते करपू शकतं आणि तेही आपल्या हिताचं ठरत नाही. हा केवळ कल्पनाविलास नाही. हे कठोर वास्तव आहे. म्हणूनच आपल्याला अत्यंत सावधपणानं पावलं टाकण्याची गरज आहे. जी घटना भूतकाळातील असंख्य पिढ्यांची गुलामगिरी नष्ट करणारी आहे आणि भविष्यकाळातील असंख्य पिढ्यांचं कल्याण करणारी ठरेल असा आपला विश्वास आहे, ती घटना घडवतांना संयम ठेवल्यामुळं बिघडत तर काहीच नाही, उलट अधिक चांगलं घडवण्याचा वाव मिळतो. युगायुगांना प्रभावित करणाऱ्या निर्मितीचं स्वप्न पाहताना चार-दोन वर्षांचा काळ एका क्षणाएवढाही दीर्घ नाही,हे शांतपणे समजून घेणं अगदी अपरिहार्य आहे.

==हा शिवधर्म प्रकटनाचा सोहळा ==
आपल्या भावी प्रवासाच प्रदीर्घ मार्ग जर आपण लख्खपणानं आपल्या नजरेसमोर आणला, तर इथून पुढची तीन वर्ष म्हणजे एक त्रिवर्षात्मक क्षण आहे,असं मानू या. तुळजापूरच्या पहिल्या शिवधर्म परिषदेच्या रूपानं आपण एक धर्मवेल  लावली आहे. आज इथं जिजाऊंच्या जयंतीदिनी आणी त्यंच्या जन्मस्थानी त्या वेलीवर एक टपोरी कळी आली असून नेमकी या क्षणी ती उमलू लागली आहे. आत्ताच क्षण हा त्या कळीच्या उमलण्याचा प्रारंभबिंदू आहे. येत्या सुमारे तीन वर्षात आपल्या अथक प्रयत्नांमुळे ती कळी उमलण्याची प्रक्रिया पुर्ण होईल आणि तो त्या प्रक्रियेचा समाप्तिबिंबू असेल. त्या समाप्तिबिंबूनंतर आपण परिपुर्ण शिवधर्मी होणार आहोत. तोपर्यंतचा काळ हा शिवधर्माचं स्वरूप अधिक सुस्प्ष्टपणे समजून घेण्याच, आपल्या अंगी शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक ती पात्रता प्राप्त करण्यासाठी साधना कर्ण्याचा आणि आपल्या भूमिकेच्या संदर्भात जास्तीत जास्त लोकांशी हार्दिक संवाद साधण्याचा काळ आहे, हे ध्यानात घेऊन आपण आजपासूनच या कार्याला वाहून घेऊ या. याचा अर्थ या क्षणी चालू असलेला हा स्वतंत्र्योत्सव येती सुमारे तीन वर्ष अखंडपणे चलू राहील असं मानू या आणि आजचा हा उत्सव शिवधर्म प्रकटनाचा सोहळा म्हणून आपल्या अंतरंगात, आपल्या रोमरोमात साठवून ठेऊ या. हे कार्य आपण पिढ्या-न्-पिढ्या करीत राहू या‌हिवधर्माच्या स्वरूपाविषयी काही मांडणी प्राथमिक आचारसंहितेच्या आणि इतर माध्यांतून आपल्यापुढे आली आहे आणि तिच्या आधारे आपण काही प्रमाणात वाटचालही सुरू केली आहे. अधिक तपशीलवार मांडणी क्रमशः आपल्यापुढं येत जाईल आणी आपण चिकित्सापुर्वक, डोळसपणानं तिच्यावर चिंतन करून ती समाजापुढे ठेवाल, असा आमचा विश्वास आहे.

(To be continued)
(Speech by Dr.A.H.Salunkhe at JIjau Srishti, Sindkhed Raja at 12 january,2005)

Leave a Comment »

RSS feed for comments on this post.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a free website or blog at WordPress.com.
Entries and comments feeds.

%d bloggers like this: