“आम्ही काय गुलाम आहोत?”

October 1, 2006 at 7:08 am | Posted in Uncategorized | 3 Comments

सहज दीक्षाभूमीसमोर फिरत होतो. एका स्टॉलवर जिजाई प्रकाशनाची बरीच पुस्तके दिसली. श्रीमंत कोकाट्यांचं ‘खरा शिक्षकदिन-२८ नोव्हेंबर’; पुरुषोत्तम खेडेकरांचं ‘आरक्षण वाढवा,देश वाचवा’; चंद्रशेखर शिखरे सरांचं ‘प्रतिइतिहास’ आणखी खूप काही! आपल्या घरची माणसं भेटल्यासारखं वाटलं. आणि जी माणसं स्टॉल चालवत होती त्याच्याशी दोन गोष्टी कराव्याश्या वाटल्या. अशी पुस्तकं विकणारी माणसं सहसा धंदेवाईक प्रकाशक नसतात.तर आपला विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा एवढ्याचसाठी न नफा न तोटा या तत्त्वावर काम करणारी जागरूक माणसं असतात हा माझा वैयक्तीक अनुभव!

दोघही प्राथमिक शिक्षक,दसऱ्याच्या दोन दिवसांच्या सुटीचा फायदा घेत विचार पसरवायला निघाली होती.थोड्याश्या ओळखीनंतर घरगुती गोष्टी सुरू झाल्या. सरांनी त्यांच्या तिसरीतल्या मुलाची एक गोष्ट सांगितली-

शेजाऱ्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा. मुलांना प्रसाद घ्यायला बोलवण्यासाठी त्यांच्याकडून कुणी बाई आली. अन् मुलाला म्हटलं-
“चल रे प्रसाद घ्यायला!”
“नाही येणार.”
“का?”
“आम्ही काय गुलाम आहोत?”

ते उत्तर ऐकून मीच एवढा थक्क झालो तर त्या बाईचं काय झालं असेल विचारच करायला नको.

फक्त ८-९ वर्षांची मुलं, पण त्यांनाही कळतं- सत्यनारायण, गणपती, घटस्थापना ही गुलामगिरी आहे. हे ज्यांना अजुनही कळत नाही त्यांनी काहीतरी या मुलांपासून शिकायला हवं.

मला बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा आठवत होत्या-

१) मी ब्रह्म, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
२)मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
३)मी गौरी गणपती किंवा हिंदू धर्मातील कुठल्याही देवतेला देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
४)देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
६)बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा प्रचार खोटा आणि खोडसाळ आहे अहे मी मानतो.

मी एकेक प्रतिज्ञा आठवत होतो. मी मनातल्या मनात स्वतःला गौरवान्वित feel करत होतो.
“आम्ही काय गुलाम आहोत?”

अशी पिढी घडली तर माझं बहुजन भारतात राहण्याचं स्वप्न माझ्या उतार वयापर्यंत तरी निश्चीतच पुर्ण होईल.

Advertisements

3 Comments »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

 1. हा प्रसंग वाचून मला मनापासून वाईट वाटलं… (कुणी ह्याला ‘मनुवादी विचारसरणी’ चं लेबल लावेल का अशी भीतिसुद्धा वाटते.)

  दोन अडीच हजार वर्षांपूर्वी कुणी-कुणावर अत्याचार केलेत ह्याच्याशी आजच्या पीढीला कर्तव्य का असावं हा एक प्रश्न. ‘मावशी आम्हाला प्रसादाला न्यायला आली’ असा निर्भेळ-निष्पाप त्यांच्या मनातून कुणी हिरावला असेल आणि ह्यातून त्या मुलांच आणि त्यांच्या ‘इतर’ मित्रांमध्ये ह्या वयात काय दरी पडली असेल ह्याचा विचार केलाय का आपण, लेखक हो? (प्रसाद निदान ‘खाऊ’ म्हणून तरी गोड मानता आला असता! पण आज २००६ साली मिशा फेंदारून जगण्यात काय शहाणपण आहे? त्याने कुणावरचा अन्याय मिटतोय, किंवा नवा होणारा अन्याय वाचतोय? मनं मात्र नक्की दुभंगतायत!)

  मला बहुजन भारतात नाही जगायचंय! मला ‘समस्तजन’ भारतात जगायचंय. राहुलदादाच्या मुलांनी माझ्या घरी गणपतीत मोदक खायला यावं, माझी मुलं आणि सलमादीदीच्या मुलांनी शीर-खुरमा मांडीला मांडी लावून खावा. मी नाही माझ्या मुलांना हा संशयी रागीटपणा शिकवणार! आणि ह्याला जर ‘मनुवाद’ म्हणत असतील, तर हो!! मी मनुवादीच आहे!

 2. माझी पहिली टीप फारच भावनावेगात लिहिलेली वाटत असली तर हा तिचा सरळसाधा गोषवारा…

  “नव्या पिढीतल्या भारतातल्या मुलांनी ह्या भिंतींशिवाय जगावं. आपल्या मित्राच्या सणात जायला त्याच्या धर्माशी सहमत हवं असं नाही. उत्सवी उत्साह आणि निर्भेळ आनंदचे चार क्षण एकत्र जगल्याने चाळीस क्षणांच्या गोडव्यात शिरतात. धर्म घराच्या चार भिंतीत ठेवून ऑफ़िसात आणि चारचौघांत भारतीय मानव म्हणून या हीच विनंती! ”

  Do I need to make it any clearer?

 3. Brother Yogesh,
  Your sensibility is worth appreciating. It offers affection and warmth but as usual it appears nothing but crocodile tears.

  Here you write about ‘samastajan’ millions of ‘your brothers’ are there busy in writing and acting to brake your dream in pieces. You will have to replace them once or twice.. in your lifetime.


Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Blog at WordPress.com.
Entries and comments feeds.

%d bloggers like this: