प्रतिइतिहास

October 17, 2006 at 1:54 pm | Posted in Great Writings | 4 Comments

चंद्रशेखर शिखरे यांचे प्रतिइतिहास हे पुस्तक जिजाई प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. शिवयारांच्या आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक खरच अभ्यासपुर्ण आहे. या पुस्तकास आ. ह. साळुंखे यांची प्रस्तावना लाभली असून पुरुषोत्तम खेडेकर यांनीसुद्धा या पुस्तकाच्या सुरुवातीस आपले मनोगत स्पष्ट केले आहे. स्वतः लेखकाने प्रति इतिहास हे नाव ठेवण्यामागची व एकंदरीतच पुस्तक लिहिण्यामागची भुमिका स्पष्ट केली आहे.

१) Hindu king and Islamic India चे मिथक.

या भागामध्ये शिवाजीराजे खरंच फक्त हिंदुंचे राजे होते का? त्यावेळचा भारत खरंच इस्लामिक होता का? यासारख्या प्रश्नांचे साधार विवेचन केले आहे. James Lane सारख्या परकीय लेखकच्या लेखनामागे कोणती प्रेरणा असावी? या मुद्द्यावर तर्कपुर्ण विवेचन केले आहे.

गोब्राह्मणप्रतिपालक की कुळवाडीभूषण?,शिवराज्याभिषेकाचा वाद, शिवरायांचे खरे गुरू, रामदासांना शिवरायांचे गुरू बनवण्याचा कट, स्वनामधन्य शिवशाहीर ब.मो.पुरंदरे, ई. भाग मुळातून वाचावे असेच आहेत.

Advertisements

शिवधर्म प्रतिज्ञा

October 1, 2006 at 12:47 pm | Posted in जय जिजाऊ ! | 4 Comments

१२ जानेवारी २००५ रोजी शिवधर्म प्रकटन उत्सवात तीन लाख बहुजनांनी शिवधर्मात प्रवेश करतांना घेतलेली प्रतिज्ञा!

मी (स्वतःचे नाव)(आईचे नाव)(वडिलांचे नाव)(आडनाव)
आज जिजाऊंच्या प्रेरणेने शिवधर्माच्या दिशेने वाटचाल करण्याची शपथ घेत आहे.येत्या तीन वर्षाट परिपुर्ण शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक असलेली कठोर साधना करण्यासाठी मी आज कटिबद्ध होत आहे.
मी शिवधर्माच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीन. शिवधर्माची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी अयुष्यभर कार्यरत राहीन,अशी मी प्रतिज्ञा करतो/करते.

जय जिजाऊ!

आगामी शिवधर्म दीक्षाविधी सोहळा जिजाऊ सृष्टी,सिंदखेड राजा जि.बुलडाणा येथे १२ जानेवारी २००८, माँ जिजाऊंच्या जन्मदिनी होणार आहे.

जिजाऊ वंदना

October 1, 2006 at 12:32 pm | Posted in जय जिजाऊ !, Great Writings | Leave a comment

जिजाऊ वंदना ही शिवधर्माची अधिकृत प्रार्थना आहे. सर्व जिज्ञासू आणि शिवधर्मियांसाठी ही जिजाऊ वंदना येथे उपलब्ध करून देत आहे.

जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥

तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥

तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥

जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ !

टीप- जिजाऊवंदना एकट्याने अथवा सामुहिक म्हणता येऊ शकते. मनातल्या मनात डोळे मिटून प्रर्थनेसारखे वंदन करता येते. सामुहिक ठिकाणी हात जोडून वंदना म्हणावी.

“आम्ही काय गुलाम आहोत?”

October 1, 2006 at 7:08 am | Posted in Uncategorized | 3 Comments

सहज दीक्षाभूमीसमोर फिरत होतो. एका स्टॉलवर जिजाई प्रकाशनाची बरीच पुस्तके दिसली. श्रीमंत कोकाट्यांचं ‘खरा शिक्षकदिन-२८ नोव्हेंबर’; पुरुषोत्तम खेडेकरांचं ‘आरक्षण वाढवा,देश वाचवा’; चंद्रशेखर शिखरे सरांचं ‘प्रतिइतिहास’ आणखी खूप काही! आपल्या घरची माणसं भेटल्यासारखं वाटलं. आणि जी माणसं स्टॉल चालवत होती त्याच्याशी दोन गोष्टी कराव्याश्या वाटल्या. अशी पुस्तकं विकणारी माणसं सहसा धंदेवाईक प्रकाशक नसतात.तर आपला विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा एवढ्याचसाठी न नफा न तोटा या तत्त्वावर काम करणारी जागरूक माणसं असतात हा माझा वैयक्तीक अनुभव!

दोघही प्राथमिक शिक्षक,दसऱ्याच्या दोन दिवसांच्या सुटीचा फायदा घेत विचार पसरवायला निघाली होती.थोड्याश्या ओळखीनंतर घरगुती गोष्टी सुरू झाल्या. सरांनी त्यांच्या तिसरीतल्या मुलाची एक गोष्ट सांगितली-

शेजाऱ्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा. मुलांना प्रसाद घ्यायला बोलवण्यासाठी त्यांच्याकडून कुणी बाई आली. अन् मुलाला म्हटलं-
“चल रे प्रसाद घ्यायला!”
“नाही येणार.”
“का?”
“आम्ही काय गुलाम आहोत?”

ते उत्तर ऐकून मीच एवढा थक्क झालो तर त्या बाईचं काय झालं असेल विचारच करायला नको.

फक्त ८-९ वर्षांची मुलं, पण त्यांनाही कळतं- सत्यनारायण, गणपती, घटस्थापना ही गुलामगिरी आहे. हे ज्यांना अजुनही कळत नाही त्यांनी काहीतरी या मुलांपासून शिकायला हवं.

मला बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा आठवत होत्या-

१) मी ब्रह्म, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
२)मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
३)मी गौरी गणपती किंवा हिंदू धर्मातील कुठल्याही देवतेला देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
४)देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
६)बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा प्रचार खोटा आणि खोडसाळ आहे अहे मी मानतो.

मी एकेक प्रतिज्ञा आठवत होतो. मी मनातल्या मनात स्वतःला गौरवान्वित feel करत होतो.
“आम्ही काय गुलाम आहोत?”

अशी पिढी घडली तर माझं बहुजन भारतात राहण्याचं स्वप्न माझ्या उतार वयापर्यंत तरी निश्चीतच पुर्ण होईल.

बुद्धयुगाची प्रतिकृती….

October 1, 2006 at 6:11 am | Posted in Uncategorized | Leave a comment

 दि.३० सप्टेंबर २००६…..
स्थळ- पवित्र दीक्षाभूमी, नागपूर

दुपारची वेळ. हजारो कषाय वस्त्रधारी उपासक शिस्तीत उभे. पुज्य भदन्त सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली आठ हजार उपासकांनी श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. रस्त्यांवर जिकडे तिकडे चिवरधारी श्रामणेर दिसतायत,जणू काही मी बुद्धकाळात राहत आहे.आता कुठून तरी स्वतः भगवान बुद्ध येतील आणि धम्मदेसना करतील असं वाटतंय,इतकं जिवंत वातावरण आहे.

तिकडे लक्ष्मण माने, ऍड.एकनाथराव आव्हाड यांचाही दीक्षाविधी पवित्र दीक्षाभूमीवर पार पडलाय. त्यांच्या मागोमाग विमुक्त भटक्या जमाती आणि मातंग समाजातील आमचे भाईबांधव बुद्धाच्या सद्धम्मात प्रवेश करत आहेत.

संपुर्ण भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं,ते स्वप्न दृष्टीपथात येतंय. अजून ते अजून थोडं दूर असेल पण आम्ही त्या युगाच्या हाका ऐकतोय. मी नागपुरात बुद्ध युगाची प्रतिकृती पाहत आहे. मला माहित आहे त्यांच्या हृदया धडकी भरल्याशिवाय राहणार नाही .

Create a free website or blog at WordPress.com.
Entries and comments feeds.