पंखांना आकाश दिसावे..

September 16, 2006 at 4:34 am | Posted in जय जिजाऊ ! | 1 Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक विधान अतिशय प्रसिद्ध आहे. “गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणिव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील” आपण सर्वांनी हे विधान बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आणि वाचलेलं आहे.पण या विधनातील मर्म मात्र अजून बऱ्याच लोकांना कळलेलं दिसत नाही. कदाचित ‘अतिपरिचयद् अवज्ञा’ अशी या विधानाची गती झाली असावी.

हिंदू धर्मातील महार या जातीने बाबासाहेबांच्या या विधानाची किंमत जाणली अन् आज तो समाज सर्व अंगांनी फुलत फळत आहे. इतरांनी मात्र या विधानाकडे हवे तितके लक्षच दिले नाही. अजुनही हिंदु धर्मात शुद्राच्या पायरीवर उभा असलेला मराठा, कुणबी, तेली, माळी, कुंभार, सुतार, लोहार ई.ई. समाज त्या पायरीवर उभा राहण्यातच धन्यता मानत आहे.किंबहुना आपण या पायरीवर उभे आहोत हेच त्यांना माहित नाही. हिंदू म्हणवण्यातच ते स्वतःची धन्यता मानतात.

यापार्श्वभूमीवर शिवधर्माच्या उदयाने समाजात बरेच परिवर्तन घडून येत आहे. लोकांना हिंदू वैदिक धर्मात त्यांचे नेमके स्थान काय आहे ते कळायला लागले आहे. लोक हळूहळू जागे होत आहेत, पण समाजप्रबोधनाची ही गती पुरेशी मात्र नाही. प्रसारमाध्यमे अजुनही जागी झालेली नाहीत आणि ती जोपर्यंत त्यांच्या ताब्यात आहेत तोपर्यंत ती जागी होणारही नाहीत. मराठामार्ग, जिजाऊ संदेश, बळीराज धोटे यांचे भुमीपुत्राची हाक ही काही नियतकालिके आहेत पण त्यांचा वाचकवर्ग ठाराविक आहे हेसुद्धा नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मा.प्रकाश पोहरे यांचे दै.देशोन्नती महत्त्वाची भुमीका पार पाडत आहे.

शेवटी महत्वाचा मुद्दा हा आहे की लोकांनी त्यांच्या डोक्यांनी विचार करावा अन् त्यांना तो विचार करायला कुणीतरी उद्युक्त करावं. मराठा सेवा संघ, भारतीय सत्यशोधक समाज हे काम अतिशय समर्पित भावनेनं, पोटतिडकीनं करत आहेत. पण तेवढ्यानं आत भागणार नाही. स्वतःच्या स्वाभिमानाचा हा विचार प्रत्येकाच्या मनात पेटायला हवा. पिंजऱ्याला चिकटलेल्या पाखरांना आपल्या पंखांची जाणिव व्हावी, पिंजऱ्याबाहेर अनंत आकाश आपली वाट पाहत आहे.

Advertisements

हिंदू सहिष्णुता

September 12, 2006 at 3:25 am | Posted in लेख | 1 Comment

हिंदुंना सामन्यतः आपल्या सहिष्णुतेचा अतिशय अभिमान असलेला दिसून येतो. पण याचा थोडा विचार केला तर यात एक वेगळाच प्रकार दिसून येतो.मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोक त्यांच्या स्वधर्मातील लोकांशी अतिशय सौहार्दाने वागतांना दिसतात.पण इतर धर्मीयांबाबत त्यांचा दृष्टीकोण तितकसा सहिष्णू दिसत नाही.ते इतर धर्मियांना आपल्या धर्मात वळवण्यासठी भरपूर प्रयत्न करतांना दिसतात.याउलट हिंदू इतर धर्मांशी भरपूर सहिष्णुतेने वागतात.ते जेवढ्या श्रद्धेने गणपतीसमोर डोकं टेकवतात तेवढ्याच श्रद्धेने एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्येही प्रार्थना करतात.पण स्वधर्मियांसोबत हिंदूंचं वर्तन कसं असतं? धर्मातील उच्चवर्णीय लोक इतर धर्मीयांसोबत भलेही संबंध ठेवतील पण आपल्याच धर्मबांधवांबद्दल त्यांना तितकिशी आपुलकी नसते. महारांनी तर त्यांना नरकसमान वाटणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा सन्मार्ग स्विकारला तरी सवर्ण हिंदूंच्या मनातील त्यंच्या बद्दलचा अकस अजून पुर्ण दूर झाल नाही. अजुनही अभिजनांच्या सभेत बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तर कपाळावर आठ्या पडतात,हे कशाचं द्योतक आहे? असहिष्णू असलेल्या इतर धर्मियांना भलेही अश्या पागलाची उपमा देता येईल जे दुसऱ्यांना दगडं मारतात पण हिंदुंचं काय? ते तर अश्या पागलप्रमाणे आहेत जो वेडाच्या भरत आपल्याच हात,पाय आदि अवयवांना चावत आहे. या चर्चेद्वारे मला कुठल्याही धर्माला दोष द्यायचा नाहीये,पण हिंदुंनी त्यांच्या धर्माबद्दल थोडं आत्मचिंतन करावं इतकच हेतू आहे. तो सफ़ल व्हावा इतकीच अपेक्षा!
शिवश्री

Depicting Buddha as Hindu

September 9, 2006 at 2:10 pm | Posted in Great Writings | Leave a comment
               For last two three years, Sangha-parivar is trying to depict to the international community, that they respect the Buddha. While doing that they use terminology depicting him as a Hindu. About Ambedkar also, similar thing is seen, books are written to show the work of Hegdewar and Ambedkar was same. We find Shankaracharyas garlanding the photo of Dr. Ambedkar. We find Brahmanic dignitaries like Sankaracharya paying a visit to Nagpur Diksha-bhoomi to pay tributes. Declaring Buddha as an avatara of god was the beginning

They declared the Buddha as an avatara of Vishnu, some times around eighth century, as a verse to this effect from Matsya Purana is engraved in a monument at Mahabalipuram. The process seems to be completed by the time of Jaydeo writing “Gita Govind” in 12th century, including Buddha’s name in it. We are also aware that an average Brahmin takes a great pride that Buddhism was driven away from this land by Adi-Sankara.

How a non-existent religion can die?

About declaring the Buddha as ninth avatara of Vishnu, L. M. Joshi observes that it was a “remarkable cultural feat”, achieved by the Brahmanic Puranas, which later caused confusion in the minds of people with the result that Buddhism came to be treated as a “heretical” and “aesthetic” branch of Brahmanism.

The present scholars like P. V. Kane, Radhakrishnan and even Swami Vivekanand, have pushed this confusion further back to the time of origin of Buddhism, by saying that Upanishadas are the origin of Buddhist thought. To this list must be added the name of B. G. Tilak, who devoted a full chapter in “Gita Rahashya” to prove that Buddhism was an off-shoot of Hinduism, (and one more chapter for proving that Christianity arose from Buddhism and hence eventually from Hinduism). Commenting Swami Vivekanada’s statement that the Swami and other Hindus did not understand Buddha’s teachings to be an honest confession, Joshi observes:

“… Not only the ancient and medieval brahmin teachers did not understand Buddhism; modern scholars born into the Brahmanical tradition have not shown any better understanding. Shankara, Kumarila, Udayana, and Sayana- Madhava did not understand Buddhism. This is true also of Tagore, Gandhi, Coomaraswamy and Radhakrishnan. …” [L. M. Joshi, “Aspects of Buddhism in Indian History”, Buddhist Publication Society, Candy, 1973, (Wheel publ. 195/196), p.12]

Showing a great surprise of Brahmanic scholars claiming both that Buddhism was just a refined “Hinduism”, and also claiming with pride that Buddhism was driven away by the Brahmanas and it has died down, he sarcastically observes:

“… The causes of the decline of Buddhism in India are attributed either to Tantrika practices or to Muslim invasion, or to both. Nobody even imagines that if Buddhism were only a “reformed” or “refined” version of “Hinduism” how it could be said to have declined and died away while “Hinduism” is still flourishing and is the faith of majority of Indians. Buddhism can be said to have declined only when there was evidence for its existence at a certain period in Indian history apart from the existence of “Hinduism”. If Buddhism did not exist apart from Brahmanism or “Hinduism” it did not die at all. A non-existent tradition or way of life does not die. The theory of decline of Buddhism, from the standpoint of “traditional” history is a false theory. On the other hand, if the decline of Buddhism in India was a historical fact, the theory of its origin as a “reformed” Brahmanism is a false one and must be discarded.” [L. M. Joshi, Ibid., p.14]

I feel that our friends of Buddhism from abroad, who visit Indian Buddhist centres, as a mark of great respect and reverence to the Buddha, should be warned of the practices of present day Sangha- parivar. The institutions like those of shri Jaysuriyaji could play a great role in this.

REproduced From http://www.ambedkar.org

“गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो”

September 6, 2006 at 3:48 am | Posted in Great Writings, speeches | Leave a comment

जय जिजाऊ!
      आपल्यापैकी बऱ्याच जणांनी डॉ. आ. ह. साळुंखे यांचा “गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो” हा लेख मुळात वाचला असेल.काहींनी वाचला नसेलही. खरंच वाचावा आणि विचार करावा असाच तो लेख आहे. ‘आहं’चे त्याच नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.त्या संपुर्ण पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद या महाजालावर  नज़रेस पडला.आपल्या सर्वांच्या मदतीसाठी हा दुवा-

http://www.shivdharma.com/shivdrama_AHSalunkhe.pdf

Create a free website or blog at WordPress.com.
Entries and comments feeds.