जय जिजाऊ !

June 20, 2006 at 1:28 pm | Posted in जय जिजाऊ ! | 1 Comment

परिवर्तनाच्या चळवळीत महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या या भूमीने एकापाठोपाठ अशा अशा नव्या विचारांना सतत जन्म दिला आहे जे आपपल्या काळात जगासाठी पथप्रदर्शक ठरले होते आणि ठरत आहेत.

या महाराष्ट्राच्या भूमीत पुन्हा एकदा नवीन विचारांच्या उदयाने शिवधर्माचे प्रकटन आहे. शिवधर्म हा आजच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे. शिवधर्म एक शिकवण आहे- स्वाभिमान हरविलेल्या बहुजनांना मोकळा श्वास घेण्याची ! शिवधर्म एक जीवनपद्धती आहे ताठ मानेने जगण्याची ! शिवधर्म एक मार्ग आहे समतेच्या जगात जाण्याचा!

शिवधर्माच्या या विचारपिठावर होऊ दे एक वैचारीक मंथन, जे घेऊन जाईल तुम्हाला आणि मला एका नवीन जगात जेथे आपले पाय शेंदरी दगडांना ठेचाळणार नाहीत, आपल्या तथाकथित हिंदुत्वाचे शिलेदार जिथे तुम्हाला-मला फ़सऊ शकणार नाहीत देवाच्या, धर्माच्या, वर्णाच्या आणि हिंदुराष्ट्राच्या नावावर!

जय जिजाऊ !

Advertisements

1 Comment »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

  1. एका नवीन जगात जेथे आपले पाय शेंदरी दगडांना ठेचाळणार नाहीत

    वा ! सुंदर. अशाच आणखी लिखाणाची वाट बघतोय.

    – मिलिंद

  2. शिवधर्माच्या या व्यासपीठावर खरंच चर्चेची अपेक्षा आहे. आता पर्यंत हिंदू धर्माला शिव्याच ऐकल्या आहेत. काही सृजनात्मक चर्चेची आस आहे.
    नीलकांत


Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a free website or blog at WordPress.com.
Entries and comments feeds.

%d bloggers like this: