दीपस्तंभ:- डॉ.पंजाबराव देशमुख

December 26, 2006 at 5:42 am | Posted in Din Vishesh | 1 Comment

bhau.jpgदि.२७ डिसेंबर ! डॉ.भाऊसाहेब देशमुख यांची जयंती!

शेतकऱ्यांचे हक्कांसाठी लढणारे महान नेतृत्व! भारताचे माजी कृषिमंत्री! बहुजनांच्या स्वाभिमानासाठी लढणारे स्वाभिमानी काळीज! शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे महान शिक्षणतज्ञ!

भाऊसाहेबांसारख्या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन!

http://en.wikipedia.org/wiki/Dr.Panjabrao_Deshmukh

बदनाम आपणच होतोय…

December 1, 2006 at 8:12 am | Posted in लेख | Leave a comment

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कोण्यातरी माथेफिरू माणसाने बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केली. काल दिवसभर संपुर्ण महाराष्ट्रात याचे भयंकर प्रतिसाद उमटत होते. आजही बऱ्याच ठिकाणी संचारबंदी चालू आहे. मुंबाईमध्ये तर काल डेक्कन क्वीन आणि एक लोकल ट्रेनही जाळली.

काय होतय हे आजकाल? कुठे जात आहोत आपण? ही आपलीच चळवळ आहे का? बाबासाहेबांना हेच अपेक्षीत होतं?

आपण बाबासाहेबांचे वाटेने जाणारे ज्ञानमार्गी आहोत. बाबासाहेबांबद्दल आपण सर्वांनाच नितांत आदर आहे.त्यांच्याबद्दल आपल्या भावना इतक्या उत्कट आहेत की त्यांच्याविरुद्ध आपण एक शब्दही सहन करू शकत नाही. हे सगळं बरोबर आहे पण आजकाल आपली चळवळ ज्या मार्गानं जातेय तो मार्ग त्या महामानवाच्या नावाला शोभणारा मुळीच नाही.

आपण प्रत्येक अपमान मुकाट्याने सहन करावेत असं कोणीच म्हणणार नाहे, पण हिंसाचार हा काही बुद्धाचा मार्ग नाही. खैरलांजीमध्ये जे काही झालं ते किंवा कानपुरची घटना ह्या निश्चितच निषेधार्ह होत्या पण आपला मार्ग मात्र चुकीचा होता. यामुळे आपणच बदनाम होत आहोत. ‘यांना दुसरं येतच काय?’ अश्या तऱ्हेच्या प्रतिक्रिया आत्तच यायला लागल्या आहेत.

ही वेळ आहे खरंच आपल्याला काय काय येतं ते दाखवण्याची! ‘यांना दुसरं येतच काय?’  म्हणण्याअगोदर त्यांना दहा हज्जार वेळा विचार करावा लागला पाहिजे,असं करून दाखवण्याची! असं करून दाखवण्याची की यांच्या पायाकालची जमीन सरकली पाहिजेत.

आणि या जमिनीला आताच हादरे बसायला लागले आहेत. बुडाखालच्या सरकारी नोकरीच्या खुर्च्या खिळखिळ्या व्हायला लागल्या आहेत. अशावेळी आपल्या बदनामीसाठी त्यांना बहाणा पुरवण्यात कसला शहाणपणा!

ही आग लवकर विझायला हवी. मनाला नवनवे मोहर फुटू द्या! आसमंत भारून जाऊ द्या आपल्या मोहराच्या सुगंधाने! आपल्याला हा मोहर देणाऱ्या वसंताची पुण्यतिथी लवकरच येतेय. एका नव्या आत्माभिमानाने त्यांना सामोरे जाऊया! पुढच्यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जातांना आपल्या मान लाजेने नाहे तर फक्त कृतज्ञतेनं झुकलेली असावी.

या पुन्हा एकदा मनापासून प्रतिज्ञा करूया-

“पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि”
(मी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करेन अशी मी प्रतिज्ञा करते/करतो)

साधू! साधू!! साधू!!!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

November 28, 2006 at 12:00 am | Posted in Din Vishesh | Leave a comment

२८ नोव्हेंबर !  भारतीय शैक्षणिक व सामाजिक क्रांतिचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतीदिन! बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या या महात्म्याला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनःपुर्वक आदरांजली!

चला,बहुजनांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या या महात्म्याच्या कार्याला वंदन करून २८ नोव्हे. हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळुया!

भारतीय संविधान वर्धापनदिन!

November 26, 2006 at 7:05 am | Posted in Din Vishesh | Leave a comment

जवळपास तीन वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यासानंतर आणि परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संधान अस्तित्वात आले. या युगप्रवर्तक घटनेला आज ५७ वर्ष पुर्ण होत आहेत.

मनुस्मृतीला नाकारून सर्व भारतियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या त्या थोर महात्म्याला आजच्या दिवशी मनःपुर्वक आदरांजली!

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना,
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!

PREAMBLE-THE CONSTITUTION OF INDIA

November 26, 2006 at 6:53 am | Posted in Din Vishesh, Great Writings | Leave a comment

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:

JUSTICE, social, economic and political;

LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;

EQUALITY of status and of opportunity;

and to promote among them all

FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation;

IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

Morality(?) in Vedas.

November 23, 2006 at 3:25 pm | Posted in लेख, Great Writings | 7 Comments

If you think vedas as the base of your religion,take the evidence of the morality(?) in your Vaidik Dharma. Following is the translation of the original text in Rigveda taken from ‘Riddles In Hinduism’ by Dr.Babasaheb Ambedkar:-

 

As to morality there is hardly any discussion about it in the Rig-Veda. Nor does the Rig-Veda contain elevating examples of moral life. Three illustrations of cases on the other side may well be given:

First is the conversation between Yama and Yami who were brother

and sister.

“(Yami speaks). I invite my friend to friendship, having come over the vast and desert ocean may Vedhas, after reflecting, place in the earth the offspring (of thee) the father, endowed with excellent qualities.”

“(Yama speaks). Thy friend desires not this friendship, for although of one origin, she is of a different form; the hero sons of the great Asura (are) the upholders of heaven, enjoying vast renown.”

“(Yami speaks). The immortals take pleasure in (a union) like this which is forbidden to every mortal; let thy mind then concur with mine, and as the progenitor (of all) was the husband (of his daughter), do thou enjoy my person”

“(Yama speaks). We have not done what was done formerly; for how can we who speak truth, utter now that which is untrue? Gandharva (the sun) was in the watery (firmament), and the water was his bride. She is our common parent, hence our near affinity.”

“(Yami speaks). The divine omniform generator Twashtri, the progenitor, made us two husband and wife, even in the womb; none frustrate his undertaking; earth and heaven are conscious of this our (union).”

“(Yama speaks). Who knows anything of this (his) first day (of existence)? Who has beheld it? Who has here revealed it? The dwelling of Mitra and of Varuna is vast. What sayest thou, who punishest men with hell?”

“(Yami speaks). The desire of Yama hath approached me Yami, to lie with him in the same bed; I will abandon my person as a wife to her husband; let us exert ourselves in union like the two wheels of a wagon.”

“(Yama speaks). The spies of the Gods, which wander upon earth, never stop, never close their eyes. Associate quickly, destructress with some other than with me, and exert yourselves in union, like the two wheels of a wagon.”

“(Yami speaks). To him (Yama) let every whorshipper sacrifice both day and night, on him let the eye of the Sun repeatedly rise; (for him may) the kindred pair (day and night unite) with heaven and earth. Yami will adhere to the non-affinity of Yama.”

“(Yama speaks). The subsequent ages will come, when sisters will choose one who is not a brother (as a husband); therefore, auspicious one, choose another husband than me, and make thine arm a pillow for thy mate.”

“(Yami speaks). Is he a brother whose sister has no lord? Is she a sister (whose brother) misfortune approaches? Overcome by desire, I strongly urge this one request; unite thy person with mine.”

“(Yama speaks). I will not unite my person with thine; they call him who approaches a sister, a sinner. Enjoy pleasure with some other than me; thy brother, auspicious one, has no such desire.”

” (Yami speaks). Alas, Yama, thou art feeble; we understand not thy mind or thy heart. Some other female exbrances thee as a girth a horse, or as a creeper a tree.”

“(Yama speaks). Do thou, Yami, embrace another; and let another embrace thee as a creeper a tree; seek his affection, let him seek thine; and make a happy union.”

“May Agni, the destroyer of the Rakshasas consenting to our prayer, drive hence (the evil spirit) who (in the form of) sickness assails thine embryo, who, as the disease durnaman, assails thy womb.”

“May Agni concurring in our prayer, destroy the cannibal who, as sickness, assails thine embryo, who, as the disease durnaman, assails thy womb.”

” May we exterminate from hence (the evil spirit) who destroys the impregnating energy, the germ as it settles, the moving embryo, who seeks to destroy (the babe) when born.”

” May we exterminate from hence (the evil spirit), who separates thy thighs, who lies between husband and wife, who entering thy womb, devours (the seeds). May we exterminate from hence (the evil spirit), who in the form of brother, husband, or paramour, approaches thee, and seeks to destroy thy offspring.”

” May we exterminate from hence (the evil spirit) who, having beguiled thee by sleep or darkness, approaches thee, and seeks to destroy thy offspring.”

 

 

I may state that I have deliberately omitted a good many obscene passages to be found in the Rig-Veda and Yajur-Veda. Those who have any curiosity in the matter might look up the conversation between Surya and Pushan in Rig-Veda Mandal X. 85.37 and between Indra and Indrani in Rig-Veda. Mandal X. 86.6. A further obscenity will also be found in the Ashvamedha Section of the Yajur-Veda.

Leaving these obscenities aside and confining oneself to the prayer portion of the Rig-Veda can any one say that these are morally or spiritually elevating prayers?

As to philosophy there is nothing of it in the Rig-Veda. As Prof. Wilson observes there is in the Rig-Veda, which is the stock Veda, scarcely any indication or doctrinal or philosophical speculation, no allusion to the later notions of the several schools, nor is there any hint of metempsychosis, or of the doctrine intimately allied to it, of the repeated renovation of the world. The Vedas may be useful as a source of information regarding the social life of the Aryans. As a picture of primitive life it is full of curiosity but there is nothing elevating. There are more vices and a few virtues.

 

धाव घालेल विठू आता मोकळ्या झाल्या वाटा

November 18, 2006 at 1:53 pm | Posted in Great Writings | Leave a comment

 धाव घालेल विठू आता मोकळ्या झाल्या वाटा
धांव घाली विठू आत्तां चालू नको मंद । मज मारिती बडवे काही तरी अपराधं ।। अशी एक आर्त हाक चोखामेळ्याने अभंगाद्वारे आपल्या लेकुरवाळ्या विठुरायाला दिली होती सात- आठशे वर्षांपूर्वी. पण बडव्यांनी विठोबाला बाहेर पडू दिले नाही. संत सोयराबाईने पंढरीचे ब्राह्मणें चोख्याशी छळीले । तयालागी केलें नवल देवे ।। असे सांगत विठ्ठलासह देवांचा मोठा समूहच चोख्याच्या घरी आला असे म्हटले आहे. संत बंका त्याच्याही पुढे गेले आणि म्हणाले, बंका म्हणे ऐसा कृपाळू श्रीहरी । चोखीयाचे घरी राहे सुखे ।। संतांची, वारकऱ्यांची आभाळाएवढी श्रद्धा पाहून खरोखरच पांडुरंग घालमेला झाला असावा; पण तरीही बडव्यांचा तिढा सैल होत नव्हता. साने गुरुजींनी सत्याग्रह केला; पण तरी तो सैल झाला नाही. या सत्याग्रहानंतर कुणा एका बडव्याने विठ्ठलाच्या मूर्तीतील पंचप्राण काढून घेतले आणि एका कुपीत ठेवले असे आजही लोक सांगतात. असा हा पंढरीराया आता बडव्यांच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त होतो आहे. सर्वसामान्यांचा देव असलेल्या पांडुरंगाला पुरोहितशाहीपासून मुक्त करण्याचा लढा काल-परवा विद्रोही साहित्यापर्यंत पोहोचला. यापूर्वी चंद्रभागेच्या तीरावर, विठुरायाच्या पायरीवर आणि स्वातंत्र्यसेनानी शेलारमामांच्या बेमुदत उपोषणानिमित्ताने मुंबईतल्या हुतात्मा चौकात आणि नंतर १९७३ च्या कायद्यात गाजत राहिला. विठुरायावर आमचाच हक्क आहे. इतिहासातल्या वेगवेगळ्या राजवटींनी तो मान्यही केला आहे असे बडवे आणि उत्पातांचे म्हणणे होते. एका अर्थाने देवावर मालकी कुणाची अशाच आशयाचा हा लढा होता. बडवे त्यात विजयी होत होते आणि लाखो भक्त आणि आंदोलक पराभूत होत होते. एकवीस वर्षे कायद्याचा कीस पाडत, पळवाटा शोधत, लोकशाही रचनेतील तरतुदींना आव्हान देत मुंगीच्या गतीने खटला पुढे सरकत राहिला. खटला जेवढा काळ चालेल तेवढा क
ाळ बडव्यांची सत्ताही चालणार होती. मुंबईच्या उच्च न्यायालयाने मात्र राज्य शासनाचा कायदा वैध ठरवून बडवे व उत्पातांचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे. भक्तांच्या मते त्यांची विठुमाऊलीच मोकळी झाली आहे. आता ती सहज भेटेल. तिला डोळे भरून पाहता येईल.

स्वातंत्र्यानंतर संस्थाने जशी खालसा झाली तशी ठिकठिकाणी असलेल्या प्रमुख मंदिरांतील पुरोहितांच्या विशिष्ट घराण्यांची राजवटही खलास झाली. तिरुपती बालाजी मंदिर असेल किंवा शिर्डीचे साईबाबा मंदिर असेल तेथे शासननियुक्त विश्‍वस्थांमार्फत कारभार चालू आहे. तेथील पारंपरिक पुरोहितांनी कायद्याला फार मोठा विरोध केला नाही; पण पंढरपुरात मात्र तो झाला. पंढरपूरसाठी तयार झालेल्या खास कायद्यालाही जुमानायचे नाही असे बडव्यांनी ठरवले. १९७३ चा कायदा १९८५ मध्ये अमलात आला पण तोही अंशतःच. विठोबाच्या चरणी जमा होणारी सारी संपत्ती बडवे आणि रुक्‍मिणीमातेच्या चरणी जमा होणारी संपत्ती उत्पातांच्या मालकीची होत होती. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या बाबतीत त्यांची वर्तणूक एकाधिकारशाहीची, हुकूमशाहीची होती. कुणालाच ते जुमानत नव्हते. कशालाच जबाबदार राहत नव्हते. देव आपल्या मुठीत आहे या न्यायाने वर्षानुवर्षे हा कारभार सुरू होता. शेकडो मैल वाट तुडवत विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना अनेक वेळा विठोबाऐवजी बडव्यांचेच दर्शन घेऊन माघारी जावे लागायचे. काहींच्या वाट्याला शिव्या नि शाप यायचे. या साऱ्यांची चौकशी करण्यासाठी नोव्हेंबर १९६८मध्ये एक सदस्यीय नाडकर्णी समिती नेमली आणि समितीलाही हेच विदारक सत्य आढळून आले. विठुमाऊलीचे दर्शन हा श्रद्धेचा, भक्तीचा भाग नव्हे, तर तो धनशक्तीचा भाग बनवला गेला. श्रीमंत भक्तांना हवे तसे दर्शन आणि गरिबाने चंद्रभागेतच राहून हात जोडायचे अशी एक टोकाची विषमता देवाच्या दारात तयार झाली होती. मंदिरात दोन प्रकारे पैसा जमतो. एक विठुरायाच्या पायाशी आणि दुसरा व्यवस्थापन समितीच्या दानपेटीत. भक्तांनी विठुरायाच्या चरणीच दक्षिणा टाकावी यासाठी बडवे उघडपणे विविध मार्ग अवलंबतात. कारण हा पैसा त्यांच्या मालकीचा असतो.
अधिक पुण्य मिळवायचे असेल तर मूर्तीच्या जवळच अधिक पैसा पडायला हवा असे एक धार्मिक अर्थकारण तयार झाले होते. देवाच्या पायाला स्पर्श करणारा पैसा कितीही आला तरी त्याचा हिशेब देण्याची जबाबदारी बडव्यांवर नव्हती. बडवे श्रीमंत होत गेले आणि भक्त आपल्या मोकळ्या खिशाला दोश देत राहिले. पैसा गोळा करण्याच्या प्रश्‍नावरून बडवे आणि शासन यांच्यातच भांडणे झाली आहेत असे नव्हे तर ती बडव्या-बडव्यांमध्येही झाली आहेत. गाजली आहेत. पैसा ट्रेजरीतला असो नाही तर देवाच्या पायाजवळचा तो कलह कसा निर्माण करतो हेही विठुरायाने पाहिले. भक्त आणि बडव्यांच्या वादातून पोलिसांत आणि पुढे न्यायालयात गेलेली प्रकरणेही विठुरायाने पाहिली आहेत. एकूणच आपल्या भक्तांच्या अडवल्या जाणाऱ्या वाटाही पाहिल्या आहेत.

पंढरपुरातील विठोबाचे देवस्थान एकाच वेळी अनेक कलहांचे केंद्र बनवले जात होते. कलहाचा मुख्य केंद्रबिंदू अर्थकारणात आहे. शासनाने नेमलेल्या समितीने मंदिराचा विकास करायचा, शासनाचे पैसे खर्च करायचे आणि बडव्यांनी मात्र यापैकी काहीच न करता फक्त पैसा गोळा करायचा असे चित्र निर्माण झाले. गुंतवणूक शासनाची आणि विकास बडव्यांचा असा हा प्रकार होता. मंदिराच्या अवतीभोवती विविध कारणांनी तयार झालेली विषमता सामाजिक कलहाचा विषय बनली, तर पूजेवर आमचाच हक्क आहे आणि तो वंशपारंपरिक आहे या दाव्यामुळे धार्मिक कलह तयार झाला. एकाच वेळेला अनेक कलहांत अडकण्याची वेळ या तीर्थस्थानावर आली. विशेष म्हणजे सर्वसामान्य वारकरी आपला छळ विसरून हरिनामाच्या गजरात गुंग होत होता. विठोबा जाते ओढणाऱ्या जनीकडे, चिखल तुडवणाऱ्या गोरा कुंभाराकडे, कांद्याला विठाई म्हणणाऱ्या सावता माळीकडे आणि गुरे ओढणाऱ्या चोख्याकडे जातो तसा तो आपल्याकडेही येणारच अशा एका ठाम विश्‍वासामुळे असंख्य वारकरी बडव्यांच्या दंडेलीकडे दुर्लक्ष करीत होते. आता उच्च न्यायालयानेच ही दंडेली संपवली आहे. उद्या कदाचित हे बडवे सर्वोच्च न्यायालयात जातील, पुन्हा कालहरण करतील, कायद्यातील पळवाटा पुन्हा शोधतील हे ओघानेच आले. शासनानेही सर्वोच्च न्यायालयात ठामपणे भूमिका मांडावी. प्रकरण लवकरात लवकर निकाली निघावे यासाठी प्रयत्न करावा. विठोबा व त्याच्या लाडक्‍या नि कष्टकरी भक्तांची सहज भेट होईल यासाठी प्रयत्न करावेत. देवस्थानावर शासनाची सत्ता आली म्हणजे जादूच्या कांडीप्रमाणे रात्रीत चमत्कार घडेल, असे समजण्याचे कारण नाही. ज्या देवस्थानांत शासनाची राजवट आहे तेथील सर्व कारभार धुतल्या तांदळासारखा आहे, असे कुणीही म्हणत नाही. तेथील वादही न्यायालयात पोहोचले आहेत. तेथेही अनागोंदी चालू आहे. तेथेही दर्शनासाठी वेगळे अर
्थकारण राबविण्यात येत आहे. बाहेरचे राजकारण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. एखाद्याची राजकीय सोय म्हणून, एखादा कार्यकर्ता कुठे तरी रिचवायचा म्हणूनही देवस्थान समित्यांकडे पाहिले जाते. मंदिराचा सोपान वापरून अनेक जण सक्रिय राजकारणात येतात. धर्मस्थळाचा हा आधुनिक वापरही शासनाच्या आशीर्वादानेच चालू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर भक्तांना दिलासा देणारी, देवदर्शनाची त्यांची आस पूर्ण करणारी एक निकोप व्यवस्था तयार करायला हवी. अन्य व्यवस्थांवरचा सामान्य माणसाचा विश्‍वास कमी होऊ लागला, की देवस्थानांसमोरची गर्दी वाढते आहे, हेही शासनाने लक्षात घ्यायला हवे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर म्हणजे कोट्यवधी लोकांच्या भक्तीचा एक सहज सुंदर हुंकार आहे हेही बडव्यांनी कधी तरी समजून घेऊन हवे. ज्याचा देव त्याच्या हवाली केला, असे आनंदाने सांगायला हवे.

(साभार-दै.सकाळचा अग्रलेख)

पंढरपुरातील उत्पात संपला!

November 16, 2006 at 2:27 pm | Posted in Uncategorized | Leave a comment

नुकताच उच्च न्यायालयाचा एक निर्णय आला आहे. पंढरपूरच्या विट्ठल रुख्मिणी संस्थानावरील बडवे आणि उत्पात यांचे वर्चस्व या निर्णयाद्वारा संपुष्टात आले आहे.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वारकरी समुदायामध्ये चैतन्याची एक लहर निर्माण झाली आहे.

आषाढी कार्तिकीला महाराष्ट्राभरातील वारकरी समाज त्यांच्या लाडक्या विठुरायाला भेटायला जात असतो‌. शेकडो मैल पायी चालून जाणारे हे लोक जेव्हा पंढरीत पोहचतात तेव्हा त्यांना काय दिसते, तर त्यांचा लाडका विट्ठल बडव्यांच्या आणि उत्पांतांच्या नज़रकैदेत अडकला आहे. शेकडो मैल जोषात चालणारे पाय  शेवटच्या काही पावलांना पार करू शकत नाही,बडव्यांच्या तिजोरीत भर घालेपर्यंत विठुही दर्शन देत नव्हता म्हणे! आता मात्र उच्च न्यायालयाने  हा उत्पात संपवलाय.पुढे सर्वोच्च न्यायालय, स्टे ई प्रकार होतीलच तरीही निदान काही दिवस तर विठुरायाला मोकळा श्वास घेता येईल.

न्यायालयाने विठ्ठलाला १९७३ मध्येच मोकळं केलं होतं,पण सुखसुखी संपेल तो उत्पात कसला? तेव्हाही शेलारमामांच्या आंदोलनाची किंमत द्यावी लागली होती. आणि आता कुठल्याही किमतीवर विठ्ठलाला पुन्हा कैदेत जाण्यापासून वाचवायला त्याचा ‘वार’करी समाज पुर्णांशाने समर्थ आहे.

प्रतिइतिहास

October 17, 2006 at 1:54 pm | Posted in Great Writings | 4 Comments

चंद्रशेखर शिखरे यांचे प्रतिइतिहास हे पुस्तक जिजाई प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. शिवयारांच्या आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक खरच अभ्यासपुर्ण आहे. या पुस्तकास आ. ह. साळुंखे यांची प्रस्तावना लाभली असून पुरुषोत्तम खेडेकर यांनीसुद्धा या पुस्तकाच्या सुरुवातीस आपले मनोगत स्पष्ट केले आहे. स्वतः लेखकाने प्रति इतिहास हे नाव ठेवण्यामागची व एकंदरीतच पुस्तक लिहिण्यामागची भुमिका स्पष्ट केली आहे.

१) Hindu king and Islamic India चे मिथक.

या भागामध्ये शिवाजीराजे खरंच फक्त हिंदुंचे राजे होते का? त्यावेळचा भारत खरंच इस्लामिक होता का? यासारख्या प्रश्नांचे साधार विवेचन केले आहे. James Lane सारख्या परकीय लेखकच्या लेखनामागे कोणती प्रेरणा असावी? या मुद्द्यावर तर्कपुर्ण विवेचन केले आहे.

गोब्राह्मणप्रतिपालक की कुळवाडीभूषण?,शिवराज्याभिषेकाचा वाद, शिवरायांचे खरे गुरू, रामदासांना शिवरायांचे गुरू बनवण्याचा कट, स्वनामधन्य शिवशाहीर ब.मो.पुरंदरे, ई. भाग मुळातून वाचावे असेच आहेत.

शिवधर्म प्रतिज्ञा

October 1, 2006 at 12:47 pm | Posted in जय जिजाऊ ! | 4 Comments

१२ जानेवारी २००५ रोजी शिवधर्म प्रकटन उत्सवात तीन लाख बहुजनांनी शिवधर्मात प्रवेश करतांना घेतलेली प्रतिज्ञा!

मी (स्वतःचे नाव)(आईचे नाव)(वडिलांचे नाव)(आडनाव)
आज जिजाऊंच्या प्रेरणेने शिवधर्माच्या दिशेने वाटचाल करण्याची शपथ घेत आहे.येत्या तीन वर्षाट परिपुर्ण शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक असलेली कठोर साधना करण्यासाठी मी आज कटिबद्ध होत आहे.
मी शिवधर्माच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीन. शिवधर्माची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी अयुष्यभर कार्यरत राहीन,अशी मी प्रतिज्ञा करतो/करते.

जय जिजाऊ!

आगामी शिवधर्म दीक्षाविधी सोहळा जिजाऊ सृष्टी,सिंदखेड राजा जि.बुलडाणा येथे १२ जानेवारी २००८, माँ जिजाऊंच्या जन्मदिनी होणार आहे.

Next Page »

Blog at WordPress.com.
Entries and comments feeds.