जिजाऊ वंदना
October 1, 2006 at 12:32 pm | In Great Writings, जय जिजाऊ ! | Leave a Commentजिजाऊ वंदना ही शिवधर्माची अधिकृत प्रार्थना आहे. सर्व जिज्ञासू आणि शिवधर्मियांसाठी ही जिजाऊ वंदना येथे उपलब्ध करून देत आहे.
जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥
जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ !
टीप- जिजाऊवंदना एकट्याने अथवा सामुहिक म्हणता येऊ शकते. मनातल्या मनात डोळे मिटून प्रर्थनेसारखे वंदन करता येते. सामुहिक ठिकाणी हात जोडून वंदना म्हणावी.
No Comments Yet »
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.